Friday, April 30, 2010

जय जय महाराष्ट्र माझा !

लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आज १ मे महाराष्ट्र दिन. १ मे १९६० रोजी महाराष्ट्रा राज्याची स्थापना झाली होती.
आजच्या दिवसाचे अजून एक महत्व म्हणजे कामगार दिन.

अखेर १०६ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली. 
आज बरोबर त्या क्षणाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. या सुवर्ण मोहत्सवी महाराष्ट्रास मराठीसुचीचा मानाचा मुजरा...! 
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या समस्त महाराष्ट्रातील बांधवाना हार्दिक हार्दिक शुभेच्या..!!!!!!...
जय महाराष्ट्र...!!!
गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा !
सर्व मराठी वाचकांना मराठीसुची कडून महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आज आम्ही महाराष्ट्राबद्दल काही ब्लॉग पोस्ट्स जमा करत आहोत, त्या वेगवेगळ्या वेबसाईट वरून घेत आहोत, जर माहिती आवडली तर तुमच्या मित्रांना जरूर कळवा आणि जर काही चुकीचे असले तर आम्हाला जरूर कळवा.
प्रत्येक पोस्ट सोबत ती माहिती कुठून मिळाली आहे ते पण लिहू, म्हणजे तुम्हाला अजून जास्त माहिती वाचता येईल.
धन्यवाद.

0 comments:

प्रतिक्रिया लिहा