Thursday, April 29, 2010

स्वतःचा ब्लॉग कसा सुरु करायचा ?

मला माझ्या अनेक मित्रांनी विचारले की स्वतःचा ब्लॉग कसा सुरु करायचा ?
जर तुम्हाला तुमचा स्वतःचा ब्लॉग हवा असेल तर तो सुरु करणे अगदी सोप्पे आहे.
ह्या संगणक युगात आणि इंटरनेटवर अशा हजारो वेबसाईट आहेत की ज्या तुम्हाला तुमचा स्वतःचा ब्लॉग सुरु करण्याचा पर्याय देतात.
तुम्हाला कोणत्या वेबसाईटवर तुमचा ब्लॉग सुरु करायचा हे तुम्ही ठरवायचे.
आज आपण इथे http://www.blogger.com वर ब्लॉग कसा सुरु करायचा हे बघूया.
सगळ्यांना नीट समजावे ह्याकरिता काही चित्रे पण जोडत आहे.

१) प्रथम  http://www.blogger.com हे संकेतस्थळ (वेबसाईट) उघडा. तुम्हाला इथे दिलेल्या चित्राप्रमाणे वेबसाईट दिसेल.


२) जर तुमचे http://www.gmail.com वर खाते असेल तर तुम्ही सरळ उजव्या बाजूला दिलेल्या जागेत तुमचे सदस्य नाव आणि पासवर्ड टाकून ब्लॉगर मध्ये प्रवेश करू शकतात.
३) जर तुमचे http://www.gmail.com वर खाते नसले तर तुम्ही "CREATE A BLOG" वर क्लिक करा, आणि नवीन खाते तयार करा.
४) तुम्ही ब्लॉगर मध्ये प्रवेश केला की तुम्हाला "Create a Blog" अशी एक लिंक दिसेल.


५) आता त्या लिंकवर क्लिक करा.


६) आता "Blog title" मध्ये तुमच्या ब्लॉगचे नाव लिहा, तुम्ही ते नंतर कधीपण बदलू शकतात.
७) "Blog address (URL)" मध्ये तुमच्या ब्लॉगसाठी "UNIQUE URL" म्हणजे एक नाव लिहा. तुम्हाला हवे असलेले ब्लॉग नाव उपलब्ध आहे की नाही हे बघण्यासाठी "Check Availability" वर क्लिक करा.
८) नंतर खाली दिलेल्या जागेत तुम्हाला चित्रात दिसत असलेली अक्षरे जशीच्यातशी लिहा.



९) आता शेवटी "CONTINUE" वर क्लिक करा.
१०) आता तुमचा स्वतःचा ब्लॉग तयार झाला आहे. जर ब्लॉग तयार करतांना काही अडचण आल्यास इथे प्रतिक्रिया लिहा किवा ट्विटर अथवा फेसबुक वर संपर्क करा, आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू.
११) जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या ब्लॉगची माहिती पोचविण्यासाठी "http://www.marathisuchi.com" वर एक खाते उघडा आणि तुमच्या कविता, चारोळ्या, लेख जास्तीत जास्त मराठी माणसापर्यंत पोचवा.

0 comments:

प्रतिक्रिया लिहा