Showing posts with label blog. Show all posts
Showing posts with label blog. Show all posts

Thursday, April 11, 2013

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

मराठीसूची तर्फे नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !



Monday, January 23, 2012

प्रतिक्रिया नोंदवा फेसबुक अकाउंट वरून

आता मराठीसूची वर असलेल्या नोंदींवर प्रतिक्रिया नोंदवणे अगदी सोप्पे.
आता तुम्ही तुमच्या आवडत्या लिंकवर फेसबुक, याहू, एओल, हॉटमेल या पैकी कोणत्याही अकाउंट वरून प्रतिक्रिया लिहू शकता.
आपली प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी आपली आवडती लिंक उघडा आणि प्रतिक्रिया नोंदवा.


Friday, August 13, 2010

How to use Marathisuchi Google Chrome Extension for Reading Marathi Blog Posts

This is a simple Guide to the question -
How to use Marathisuchi Google Chrome Extension for Reading Marathi Blog Posts?

Open Google Chrome Browser. If you Don't have then you will get a message like this in other browsers



You can Download it from http://www.google.com/chrome

Then Visit / Open following page and click INSTALL https://chrome.google.com/extensions/detail/kgkbhfggebinckkekppcokijiikpebho




Wednesday, August 11, 2010

मराठीसुची गुगल क्रोम एक्सटेनशन डोउनलोड करा मराठीसूची.कॉम साठी

नमस्कार मित्रांनो,
सर्व मराठीसूची लेखकांना व वाचकांना नवनवीन मराठी ब्लोग पोस्ट्स वाचता याव्यात याकरिता आम्ही एक गुगल क्रोम एक्सटेनशन तयार केले आहे.
हे एक्सटेनशन गुगल क्रोम मध्ये जोडणे अगदी सोप्पे आहे.

खालील लिंकवर जा आणि Install वर क्लिक करा.

गुगल क्रोम एक्सटेनशन गैलरी


 - http://bit.ly/marathisuchi_chrome 
 - https://chrome.google.com/extensions/detail/kgkbhfggebinckkekppcokijiikpebho?hl=en


मराठीसूची.कॉम वरून डोउनलोड करा.


 - DOWNLOAD

Thursday, May 13, 2010

मराठीसुची ते मराठीसूची

नमस्कार मित्रांनो,
"marathisuchi" मराठीमध्ये लिहितांना "मराठीसुची" असे न लिहिता "मराठीसूची" लिहावे असे अनेक मित्रांना वाटत होते. अधिक माहितीसाठी आमचे फेसबुक पेज बघा किवा आमचे ट्विटर पेज बघा.
म्हणून आज आम्ही "मराठीसुची" चे "मराठीसूची" करत आहोत, बाकी सर्व गोष्टी आणि स्पेलिंग सगळे तसेच राहणार आहे.

Wednesday, May 5, 2010

marathisuchi.com website speed improved

आज आम्ही "मराठीसुची.कॉम" मध्ये काही अंतर्गत बदल केले आहेत, अगोदर संकेतस्थळ उघडायला जास्त वेळ लागायचा. आता तुम्ही "मराठीसुची.कॉम" ला भेट देवून बघा आणि आम्हाला कळवा की आता वेबसाईट लवकर उघडते की नाही.

Tuesday, May 4, 2010

उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद...

मराठीसुची.कॉम या संकेतस्थळाची सुरुवात  १ एप्रिल २०१० रोजी झाली.
आपल्यापैकी अनेक लोकांचे स्वतःचे मराठी ब्लॉग्स असतात, आपण नियमित लिखाणही करतो....
पण आपल्याला असे नेहमी वाटते की ते लिखाण कुणीतरी वाचावे...कुणीतरी त्यावर प्रतिक्रिया द्यावी...
आपल्यालासुद्धा इतर कुणाचे लेख, कविता वाचण्याची इच्छा असते...
केवळ आपली वाचनाची आणि लिखाणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही "मराठीसुची.कॉम" हे संकेतस्थळ सुरु केले.
जिथे तुम्ही तुमचा ब्लॉग जोडू शकता, एकदा ब्लॉग मराठीसुचीला जोडला गेला की तुमच्या ब्लॉग वरच्या ब्लॉग पोस्ट्स अगदी लगेचच "मराठीसुची.कॉम" वर प्रकाशित होतील, आणि त्या जास्तीत जास्त मराठी वाचकांपर्यंत पोचवल्या जातील.

Saturday, May 1, 2010

महाराष्ट्राच्या भौगोलिक स्थितीबद्दल

महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेला स्थित आहे. 
महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी (homogeneous) आहे व खूप मोठे क्षेत्र (महाराष्ट्र देश) पठारी आहे. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. 

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीबद्दल

ऑगस्ट १५, इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना करण्याचे हाती घेतले गेले. साधारणतः भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०६ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.

Friday, April 30, 2010

जय जय महाराष्ट्र माझा !

लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आज १ मे महाराष्ट्र दिन. १ मे १९६० रोजी महाराष्ट्रा राज्याची स्थापना झाली होती.
आजच्या दिवसाचे अजून एक महत्व म्हणजे कामगार दिन.

Thursday, April 29, 2010

स्वतःचा ब्लॉग कसा सुरु करायचा ?

मला माझ्या अनेक मित्रांनी विचारले की स्वतःचा ब्लॉग कसा सुरु करायचा ?
जर तुम्हाला तुमचा स्वतःचा ब्लॉग हवा असेल तर तो सुरु करणे अगदी सोप्पे आहे.
ह्या संगणक युगात आणि इंटरनेटवर अशा हजारो वेबसाईट आहेत की ज्या तुम्हाला तुमचा स्वतःचा ब्लॉग सुरु करण्याचा पर्याय देतात.
तुम्हाला कोणत्या वेबसाईटवर तुमचा ब्लॉग सुरु करायचा हे तुम्ही ठरवायचे.
आज आपण इथे http://www.blogger.com वर ब्लॉग कसा सुरु करायचा हे बघूया.
सगळ्यांना नीट समजावे ह्याकरिता काही चित्रे पण जोडत आहे.