मराठीसुची.कॉम या संकेतस्थळाची सुरुवात १ एप्रिल २०१० रोजी झाली.
आपल्यापैकी अनेक लोकांचे स्वतःचे मराठी ब्लॉग्स असतात, आपण नियमित लिखाणही करतो....
पण आपल्याला असे नेहमी वाटते की ते लिखाण कुणीतरी वाचावे...कुणीतरी त्यावर प्रतिक्रिया द्यावी...
आपल्यालासुद्धा इतर कुणाचे लेख, कविता वाचण्याची इच्छा असते...
केवळ आपली वाचनाची आणि लिखाणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही "मराठीसुची.कॉम" हे संकेतस्थळ सुरु केले.
जिथे तुम्ही तुमचा ब्लॉग जोडू शकता, एकदा ब्लॉग मराठीसुचीला जोडला गेला की तुमच्या ब्लॉग वरच्या ब्लॉग पोस्ट्स अगदी लगेचच "मराठीसुची.कॉम" वर प्रकाशित होतील, आणि त्या जास्तीत जास्त मराठी वाचकांपर्यंत पोचवल्या जातील.
जर तुम्हालापण तुमच्या मराठी कविता, चारोळ्या, लेख, विनोद इतरांना सांगायचे असतील तर आजच तुमचे "मराठीसुची.कॉम" वर खाते बनवा, आमचे विजेट तुमच्या ब्लॉग ला जोडा, बस एवढेच.
आणि आमच्या ह्या प्रयत्नाला तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला..अगदी पहिल्याच महिन्यात ८५५ UNIQUE भेटी आणि ३४९९ PAGEVIEWS
शिवाय यात अनेक मराठी ब्लॉग्स आणि मराठी ब्लॉगर्स चा फार मोठा सहभाग आहे. शिवाय या प्रयत्नाला "नेटभेट" ह्या मोठ्या मराठी ब्लॉग ने खूप हातभार लावला आहे, त्यांनी "मराठीसुची.कॉम" बद्दल त्यांच्या वाचकांना "गुगल अॅडसेन्स - मराठीसाठी मराठीतुन" (लेखमालिका - भाग तिसरा)" मध्ये सांगितले.
पुनःश्च एकदा उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद... आणि तुमचा प्रतिसाद असाच पुढेही मिळत राहील अशी अपेक्षा.....
तुमचे विजेट मराठीसुचीवर जोडा - http://www.marathisuchi.com/page.php?page=mitramandali
मराठीसुची on TWITTER - http://www.twitter.com/marathisuchi
मराठीसुची on FACEBOOK - http://www.facebook.com/marathisuchi
0 comments:
प्रतिक्रिया लिहा