Thursday, May 13, 2010

मराठीसुची ते मराठीसूची

नमस्कार मित्रांनो,
"marathisuchi" मराठीमध्ये लिहितांना "मराठीसुची" असे न लिहिता "मराठीसूची" लिहावे असे अनेक मित्रांना वाटत होते. अधिक माहितीसाठी आमचे फेसबुक पेज बघा किवा आमचे ट्विटर पेज बघा.
म्हणून आज आम्ही "मराठीसुची" चे "मराठीसूची" करत आहोत, बाकी सर्व गोष्टी आणि स्पेलिंग सगळे तसेच राहणार आहे.

Wednesday, May 5, 2010

marathisuchi.com website speed improved

आज आम्ही "मराठीसुची.कॉम" मध्ये काही अंतर्गत बदल केले आहेत, अगोदर संकेतस्थळ उघडायला जास्त वेळ लागायचा. आता तुम्ही "मराठीसुची.कॉम" ला भेट देवून बघा आणि आम्हाला कळवा की आता वेबसाईट लवकर उघडते की नाही.

Tuesday, May 4, 2010

उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद...

मराठीसुची.कॉम या संकेतस्थळाची सुरुवात  १ एप्रिल २०१० रोजी झाली.
आपल्यापैकी अनेक लोकांचे स्वतःचे मराठी ब्लॉग्स असतात, आपण नियमित लिखाणही करतो....
पण आपल्याला असे नेहमी वाटते की ते लिखाण कुणीतरी वाचावे...कुणीतरी त्यावर प्रतिक्रिया द्यावी...
आपल्यालासुद्धा इतर कुणाचे लेख, कविता वाचण्याची इच्छा असते...
केवळ आपली वाचनाची आणि लिखाणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही "मराठीसुची.कॉम" हे संकेतस्थळ सुरु केले.
जिथे तुम्ही तुमचा ब्लॉग जोडू शकता, एकदा ब्लॉग मराठीसुचीला जोडला गेला की तुमच्या ब्लॉग वरच्या ब्लॉग पोस्ट्स अगदी लगेचच "मराठीसुची.कॉम" वर प्रकाशित होतील, आणि त्या जास्तीत जास्त मराठी वाचकांपर्यंत पोचवल्या जातील.

Saturday, May 1, 2010

महाराष्ट्राच्या भौगोलिक स्थितीबद्दल

महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेला स्थित आहे. 
महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी (homogeneous) आहे व खूप मोठे क्षेत्र (महाराष्ट्र देश) पठारी आहे. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. 

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीबद्दल

ऑगस्ट १५, इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना करण्याचे हाती घेतले गेले. साधारणतः भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०६ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.